पुणे – एम.फिल व पीएच.डीच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.फिल व पीएच.डी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक शैक्षणिक प्रवेश विभागाने आज प्रसिद्ध केले. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात उद्यापासून (दि.25) सुरू होत आहे.

एम.फिल व पीएचडी प्रवेश परीक्षा 7 जुलै रोजी होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहे. प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेश परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीतून एम.फिल व पीएचडीसाठी प्रवेश निश्‍चिती होईल. याबाबतची सविस्तर प्रश्‍नपत्रिकेची रुपरेषा विद्यापीठाने जाहीर केली आहे. पीएचडी व एम.फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण 100 मार्काची परीक्षा असेल. त्यात संशोधन कार्यपद्धती आणि विशिष्ट विषयावंर प्रत्येकी 50 गुणांचा समावेश आहे. वस्तूनिष्ठ स्वरुपात परीक्षेचे स्वरुप असून त्यात निगेटिव्ह पद्धत राहणार नाही. या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असून सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत परीक्षा होणार आहे.

एम.फिल व पीएचडी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक
* अर्ज करण्याची सुरुवात : 25 मे
* अर्ज करण्याची अंतिम मुदत : 15 जून
* प्रवेश परीक्षा : 7 जुलै
* प्रवेश परीक्षेचा निकाल : 7 जुलै

पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाच्या 2300 तर एम.फिलच्या 190 जागा रिक्‍त आहेत. पीएच.डी व एम.फिल. प्रवेशासाठी सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना थेट मुलाखत देता येते. सेट अथवा नेट नसलेल्या उमेदवारांना मात्र विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुलाखत देता येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×