पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 14 व 15 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.
हवामान विभागाने #पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर तालुका वगळता इतर तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी घोषित करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आदेश. @ddsahyadrinews pic.twitter.com/d212YTt6Sa
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 13, 2022
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.