पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-अहमदाबाद-पुणे मार्गावर विशेष त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-अहमदाबाद मार्गावर 15 मार्चपासून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी गाडी धावणार आहे. ती पुण्याहून रात्री 9.35 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
तर, अहमदाबाद-पुणे मार्गावर 16 मार्चपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. अहमदाबादहून ही गाडी रात्री 10.30 वाजता सुटणार असून, पुणे येथे सकाळी 7.10 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी लोणावळा आणि वसई रस्ता या स्टेशनवर थांबणार आहे.