पुणे – पहिले लग्न लपविल्याने दुसरा “घरोबा’ रद्द

कौटुंबीक न्यायालयाचा महिलेला दणका : फेसबुकद्वारे ओळख झालेल्या व्यक्तीशी केला विवाह

पुणे – पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता फेसबुकवर ओळख झालेल्या दुसऱ्या व्यक्तीशी महिलेने केलेला विवाह न्यायालयाने रद्दबादल केला आहे. कौटुंबीक न्यायालयातील न्यायाधीश एन.आर.नाईकवडे यांनी हा आदेश दिला आहे. घरच्यांनी मनाच्या विरोधात पहिले लग्न केल्याने त्या महिलेने फेसबुकवरील ओळख झालेल्याशी प्रेम विवाह केला होता. विशेष म्हणजे, घरच्यांनीही मोठ्या धुमधडाक्‍यात तिच दुसरे लग्न लावून दिले होते.

माधव आणि माधवी (नावे बदललेली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. डिसेंबर 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. मात्र, माधवीने तिचे आधी लग्न झाल्याचे माधवपासून लपवले होते. माधवीचे तिच्या कुटुंबीयांनी “अरेंज मॅरेज’ केले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर तिची माधवशी फेसबुकद्वारे ओळख झाली. हळूहळू त्यांचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र, या सर्वांची माधवीच्या पहिल्या पतीला कल्पनाही नव्हती. त्याला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याने थेट माधवला गाठले. या बाबत माहिती दिली. त्यावेळी माधवने माधवीच्या कुटुंबीयांना जाब विचारला. त्यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार देखील दिली आहे. त्यानंतर माधव याने अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. विवेक शिंदे यांच्यामार्फत कौटुंबीक न्यायालयात लग्न रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने लग्न रद्दबादल ठरविले.

याविषयी अॅड. पुष्कर पाटील म्हणाले, “या घटनेवरून फेसबुकवर अनोळख्या व्यक्तीला फ्रेंड करू नका. ज्या व्यक्तीबाबात आपल्याला माहिती आहे, त्यांनाच फेंड करावे, हा बोध मिळतो. या घटनेत माधव याची काहीही चुक नसून, त्याची फसवणूक झाली आहे. तरीही त्याच्यावर एक लग्न झाल्याचा शिक्का लागला आहे. मात्र, तसे होता कामा नये. अशा घटनांमध्ये त्याच्याकडे पाहण्याची सामाजिक मानसिकता बदलली पाहिले.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)