पुणे(प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षेसाठी 1 जूनपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम कालावधी दि. 30 जूनपर्यत आहे, अशी माहिती विद्यापीठ शैक्षणिक विभागाकडून देण्यात आली.
विद्यापीठाने आज याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आला आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 1 ते 30 जून या कालावधीत अर्ज करावे लागेल. त्यानंतर या प्रवेश परीक्षेची तारीख आणि निकालाची माहिती संबंधित शैक्षणिक विभागाकडून प्रसिद्ध केले जाणार आहे.
खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी 500 रुपये, तर मागासप्रवर्ग गटातील विद्यार्थ्यांना 350 रुपये शुल्क राहणार आहे. शुल्क ऑनलाईनद्वारे भरावे लागेल. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावे लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
प्रवेश परीक्षेसाठी या https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx लिंकवर क्लिक करावे.