पुणे –केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दितील कनिष्ठ महाविद्यालयांत दोन नियमित फेऱ्यांमध्ये 38 हजार 975 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
अकरावीसाठी दोन प्रवेश फेऱ्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातील 315 कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशाच्या 1 लाख 12 हजार 725 जागा उपलब्ध आहेत. यासाठी 84 हजार 831 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
76 हजार 996 अर्ज लॉक झाले आहेत. 76 हजार 565 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. 69 हजार 480 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीत 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते.
मात्र, यातील 30 हजार 816 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या नियमित फेरी 15 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. यातील 7 हजार 650 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. कोट्यातून 644 प्रवेश या फेरीत झाले आहेत. अद्याप प्रवेशाच्या बहुसंख्य जागा रिक्त आहेत.