पुणे (प्रतिनिधी) : येवलेवाडी येथील महावीर ज्वेलर्सच्या दुकान मालकावर भर दिवसा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी बिहार येथून अटक केली.
रवि सिंग असे त्याचे नाव आहे. 2018 मध्ये सिंग याने ज्वलर्सच्या दुकान मालकावर गावठी कट्ट्याने भरदिवसा गोळीबार केला होता. त्यामध्ये दुकान मालकाचा मृत्यू झाला. तेव्हा पासून आरोपी पसार झाला होता. आरोपीला न्यायालयाने 15 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.