Pune Accident : वारजे ब्रिजवर भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; महिला ठार

पुणे – भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांची नात अपघातात जखमी झाली आहे. ही घटना 13 सप्टेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास वारजे ब्रीजवर घडली. मीना राजेंद्र वाघमारे (वय 45, रा. केळेवाडी, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सई वाघमारे असे जखमी झालेल्या नातीचे नाव आहे.

याप्रकरणी पती राजेंद्र वाघमारे (वय.56,रा. केळेवाडी कोथरुड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रॅव्हलरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र आणि त्यांची पत्नी मीना व नात सई 13 सप्टेंबरला दुचाकीवरून घराकडे चालले होते. त्यावेळी वारजे ब्रीजवर भरधाव ट्रेम्पो ट्रॅव्हरल चालकाने दिलेल्या धडकेत तिघेही खाली पडले. त्यामुळे मीना आणि सई जखमी झाले होते. उपचारादरम्यान मीना यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.