Pune Accident News : पाण्याचे टॅंकर डोक्यावरून गेल्याने तरूणीचा जागीच मृत्यू

पुणे – पाण्याचा टॅंकर चढावरुन मागे आल्याने चाकाखाली सापडून एका तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना नऱ्हे येथील एस. इंडस्ट्री जवळ घडली. याप्रकरणी टॅंकर चालकास सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

साक्षी आप्पा बाटे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रागिनी कुंकुले (19,रा.किरकटवाडी) ही गंभीर जखमी झाली आहे. टॅंकर चालक सुदाम सोमा जाधव(50,रा.धायरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रागिनी तीच्या स्कुटरवर साक्षीला घेऊन सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चालली होती. यावेळी त्यांच्या पुढे असलेला पाण्याचा टॅंकर चढावर थांबला. टॅंकर थांबल्याने त्यातील पडलेल्या पाण्यामुळे रागिनीची स्कुटर घसरुन दोघीही रस्त्यावर पडल्या.

दरम्यान टॅंकर उतारावरुन खाली आला. तो खाली येताच त्याचे चाक साक्षीच्या डोक्‍यावरुन गेले. यामध्ये ती जागेवरच मृत झाली. तर रागिनीच्या पायास व गुडघ्यास जखम झाली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.बी.कणसे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.