पुणे – हडपसर परिसरातून दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहप्रवासी महिला गंभीर जखमी झाली. याप्रक रणी मोटारचालकाला अटक करण्यात आली.
बाळासाहेब मच्छिंद्र सोनार (वय ५२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. अपघातात सोनार यांची पत्नी वैशाली (वय ४५) गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रक रणी मोटारचालक अरंजय प्रकाश बुद्रुक (वय ३५, रा.आदित्यनगर, गाडीतळ, हडपसर) याला अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी ए. व्ही. कदम यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकीस्वार सोनार आणि त्यांची पत्नी दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी पॉवर हाऊसजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात बाळासाहेब यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी वैशाली जखमी झाल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.