पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेने पादचारी मंडल आधिकारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकास पोलिसांनी अटक केली.
रिना सचिन मडके- मुंढे (वय ३२, रा. मंगलम बिल्डींग, चैतन्य हॉस्पिटलशेजारी, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मंडल आधिकारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार अक्षय महादेव एकडे (वय २५, रा. श्रेयस अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली.
याबाबत रिना यांचे पती सचिन यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिना सेनापती बापट रस्त्यावरील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्यालयात मंडल आधिकारी आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्या सेनापती बापट रस्त्यावरून निघाल्या होत्या.
पॅव्हेलियन मॉलसमोर भरधाव दुचाकीने पादचारी रिना यांना धडक दिली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.