आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे आज प्रस्ताव दाखल करणार
पुणे – महापालिकेच्या प्रस्तावित “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’च्या उभारणीसाठीचा प्रस्ताव सोमवारी “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’कडे (एमयूएचएस) पाठवण्यात येणार असून, राज्य सरकारच्या परवानगीनंतर दि.30 नोव्हेंबरच्या आत “राष्ट्रीय आरोग्य परिषदे’कडे (नॅशनल मेडिकल कौन्सिल) पाठवण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी डॉ. नायडू रुग्णालयाची साडेबारा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. प्रारंभी पुणे महापालिकेने वैद्यकीय शिक्षण ट्रस्टसोबत सामंजस्य करार करून, ही जागा ट्रस्टला भाडेकराराने उपलब्ध महाविद्यालयाची नियोजित जागा अर्जकर्त्यांच्या नावे असली पाहिजे, असे “एमयूएचएस’चे म्हणणे होते.
महापौरांसह पालिका प्रशासनाने धावपळ करत त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे. प्रस्ताव दाखल होताच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अधिकारी जागेची पाहणी करणार आहे.