पुणे – वडगाव शेरी परिसरातील विहरीत आढळला महिलेचा मृतदेह

पुणे – नगर रोड वडगाव शेरी येथील शिवांजली मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या विहीरीत एका महिलेचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळला आहे. मनिषा दिनेश शिंदे (वय.45,रा. भोसरी) असे महिलेचे नाव आहे.


महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात महिला कैद झाली असून, ती स्वताः विहीरीकडे चालत गेल्याची दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारच्या सुमारास येथील विहरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी महिलेचा मृतदेह विहरीतून काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. महिलेने स्वताः आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास चंदनगर पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.