पुणे – स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या. ही घटना मंगळवारी समोर आली. त्रिभुवन विठ्ठल कावले (वय 30, गांजवे चौक, मूळ जालना) असे या उमेदवाराचे नाव आहे. दरम्यान, नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
त्रिभुवन हा गांजवे चौकात एका वसतिगृहात कॉट बेसिसवर राहत होता. अनेक महिन्यांपासून तो राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होता. मंगळवारी दुपारी त्याचे मित्र त्याच्या खोलीकडे गेले असता, आतून दरवाजा बंद होता. दार वाजवून आणि आवाज देवुनही त्रिभुवन दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तर त्रिभुवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
सहकारी मित्रांनी ही माहिती पोलिसांना दिली. विश्रामबाग ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येचे ठोस कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते.