पुणे : सहा वर्षाच्या मुलीच्या भवितव्याचा विचार करत विभक्त राहणारे पती-पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत. वैचारिक मतभेदामुळे ते विभक्त राहत होते. झाले गेले विसरून दोघांनी नव्याने संसर सुरू केला आहे. मुलीला आता आईबरोबरच वडिलांची माया मिळणार आहे. दोघातील मतभेद मिटविण्यासाठी पती-पत्नीच्या वकिलांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरले आहे. दोघाने आता नव्याने संसार सुरू केला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. माधवीच्या वतीने अॅड.राणी कांबळे-सोनावणे यांनी, तर माधवच्या वतीने अॅड. सोपान योगराज पाटील (मनवेलकर) यांनी न्यायालयत बाजू मांडली. जून २०१८ मध्ये दोघांचा विवाह झाला. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. सुरूवातील सुरळीत संसार केला. मुलगीही झाली. त्यानंतर दोघात वैचारिक मतभेद निर्माण झाले.
मतभेद विकोपाला गेल्यावर ती मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली. मात्र, सहा महिन्यानंतर तिने नांदायला येण्यासाठीचा दावा कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. पती हजर राहिला. समुपदेशानासाठी हे प्रकरण पाठविण्यात आले. दोघाच्या वकिलांनी दोघांचे समुपदेशन केले. पती-पत्नी दोघांनी आपापली जबाबदारी पार पाडण्याचे मान्य केले. दोघे पुन्हा एकत्र आले.
“प्रत्येक दांपत्याच्या आयुष्यात मुलाचे अन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत पटवून् दिल्यास आपसातील वाद-विवाद विसरून दोघे एकत्र येऊ शकतात. इथे समुपदेशान केल्यानंतर मुलीच्या भवितव्याचा विचार करून दोघे एकत्र आले. पटवून दिल्यास अशाच प्रकारे आपसातील वाद विसरून दांपत्य एकत्र येऊ शकतात.” – अॅड. राणी-कांबळे-सोनावणे,
पत्नीच्या वकील.
“वकील एक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या प्रकरणात व्यवसाय न बघता सामाजिक बांधिलकी जपत पती-पत्नीचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनाला यश आले आहे. दोघांनी पुन्हा संसासर सुरू केला आहे.” अॅड. सोपान योगराज पाटील (मनवेलकर), पतीचे वकील.