पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा परिसरातील पिसोळी रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामतेज यादव (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
यादवचा नातेवाईक पटू यादव (वय १९) याने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामतेज यादव मजुरी करतो. गुरूवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास तो पिसोळी रस्त्याने निघाला होता. पिसोळी-उंड्री रस्त्यावर भरधाव वाहनाने पादचारी यादवला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या यादवचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहाय्यक फौजदार प्रताप डोईफोडे तपास करत आहेत.