पुणे – लिव्ह इनमध्ये रहात असताना अल्पवयीन असलेल्या प्रेयशीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर प्रियकर स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाला. प्रियकराला लोणीकंद पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सागर सारगंधर वानखेडे (28,रा.रामनगर झोपडपट्टी, पेरणे फाटा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने भारती अय्यर(17) हीचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनूसार भारती मुळची बुलढाणा येथील आहे. तीची आणी सागरची रेल्वे प्रवासात ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने दोघे लिव्ह इनमध्ये पुण्यात एकत्र राहू लागले. सागर हा रांजणगाव येथील एका कंपनीत कामाला होता.
तो भारतीच्या चारित्र्यावर वांरंवार संशय घेत होता. तीचे फोनवरचे बोलणेही त्याला संशयास्पद वाटत होते. यातूनच गुरुवारी दुपारी त्यांच्यामध्ये भांडणे झाली. त्याने रागाच्या भरात वायरने गळा आवळून तीचा खून केला. यानंतर स्वत: लोणीकंद पोलीस ठाण्यात येऊन खूनाची माहिती दिली. घटनास्थळी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. याप्रकरणाचा तपास किरण वराळ करत आहेत.