पुणे – एसीटी ग्रॅंटस् आणि हकदर्शक यांच्यातर्फे पुणे बाजार समितीमधील बाजार घटकांकरिता विशेष करोना लसीकरण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात प्रथम प्राधान्याने बाजार घटक आणि त्यानंतर इतर नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.
विशेष करोना लसीकरण मोहीम मंगळवारपासून (दि. 12) पुढील दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंदिरात राबविली जाणार आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केले जाणार आहे.
लसीच्या उपलब्धतेनुसार दररोज सुमारे 500 ते 1000 लस उपलब्ध होणार आहे. तरी सर्व बाजार घटकांनी त्यांचे आधारकार्ड व मोबाईल फोन सोबत घेऊन या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा. लसीकरणामध्ये बाजार घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.