पुणे : अजमते-ए-काश्मीर महोत्सवाच्या निमित्ताने काश्मिरी संस्कृती पुणेकरांना अनुभवता आली. या महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
काश्मिरी आणि मराठी गायन तसेच भजनासाठी प्रसिद्ध असलेल्या शमिमा अख्तर या महोत्सवाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. आलमदार भगत थिएटर तसेच मजहर सिद्दीकी, शमिमा अख्तर आणि रोहित ठाकूर यांच्या सरहद म्युझिकच्या कलाकारांचा सहभाग होता. पारंपरिक काश्मिरी लोककला, लोकगीते, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांच्या अनोख्या सादरीकरणातून सांस्कृतिक काश्मीरची परंपरा अनुभवायला मिळाली.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. संजीवकुमार शर्मा, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.चे मुख्य अभियंता अनिल कोळप आणि सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, मानव संधान विभागचे संचालक सुगध गमरे, महावितरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय कुऱ्हाडे, महावितरण नाशिकचे मुख्य अभियंता संजीव भोळे, कराडच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता नासिर काद्री, आपीएस अधिकारी कैलास कणसे, टाटा इलेक्ट्रिक उपाध्यक्ष देसले, व्हिजिलन्स ॲण्ड सिक्युरिटीच्या निशा बंडगर आदी उपस्थित होते.