पुणे – लोकसभा मतदानासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा

पुणे – पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये पुणे, बारामती, शिरुर या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील सर्व 6 विधानसभा मतदार संघ, शिरुर लोकसभा मतदार संघातील हडपसर तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील हडपसर या विधानसभा मतदार संघाचा आणि बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर, खडकवासला, भोर या विधानसभा मतदार संघांचा अंश:त समावेश आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे; तर शिरुरसाठी दि.29 एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 2,470 पोलीस कर्मचारी व 1,540 होमगार्ड तर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी 447 पोलीस कर्मचारी व 271 होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रियेत नागरिकांना निर्भयपणे सहभागी होता यावे, यासाठी पुणे पोलीस आयुक्‍तालयातर्फे मतदान केंद्र व परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये पेट्रोलिंग बरोबरच नियंत्रण कक्ष, राखीव मनुष्यबळ आदी सर्वसमावेशक बंदोबस्त योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस महासंचालक यांनी बाहेरून बंदोबस्तासाठी उपलब्ध करून दिलेले अधिकारी व कर्मचारी तसेच एस.आर.पी.एफ., सी.पी.एम.एफ. आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. हा बंदोबस्त 23 एप्रिल रोजी होणाऱ्या 2,509 मतदान केंद्रे आणि 29 एप्रिल रोजी होणाऱ्या 441 मतदान केद्रांवर लावण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंगची व्यवस्था पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांना अतिरीक्त स्ट्रायकिंग बंदोबस्तासह आवश्‍यक ते मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

बंदोबस्ताची ठळक वैशिष्ट्य
पहिल्या टप्प्यातील 2,509 बुथसाठी 2,470 पोलीस कर्मचारी, 1540 होमगार्ड
दुसऱ्या टप्प्यातील 441 बुथसाठी 447 पोलीस कर्मचारी व 271 होमगार्ड
प्रत्येक क्रिटीकल बुथसाठी एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड
मतदानाच्या दिवशी प्रत्येक पोलीस चौकी हद्दीमध्ये सतत पोलीस पेट्रोलिंगसाठी 420 कर्मचारी नियुक्त
इन्स्टंट रिप्सॉन्स टीमसाठी 124 कर्मचारी
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या वाहनासोबत मिनी स्ट्रायकिंग टीम
क्राईम रिन्स्पॉन्स टीमची तीस पथके

बंदोबस्तासाठी उपलब्ध मनुष्यबळ
पोलीस स्टेशन(30) – 2,568
मुख्यालय – 834
वाहतूक शाखा – 514
गुन्हे शाखा – 192
कोर्ट कंपनी – 146
विशेष शाखा – 126
नियंत्रण कक्ष – 60
कोर्ट आवार – 53
मनपा अतिक्रमण विभाग- 50
एकूण – 4,543

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.