पुणे – 9 प्रभाग समित्या बिनविरोध; भाजपचे 8, राष्ट्रवादीला एक अध्यक्षपद

पुणे – पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यापैकी 9 समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरीत सहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी येत्या 6 मे रोजी निवडणूक होणार आहे. बिनविरोध झालेल्या नऊ प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे आठ आणि राष्ट्रवादीला एक अध्यक्षपद मिळाले.

महापालिकेच्या 15 प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या मुक्ता जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड आणि भाजपच्या मंगला मंत्री यांनी तर धनकवडी-सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या दिशा माने आणि राष्ट्रवादीचे युवराज बेलदरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वारजे-कर्वेनगरच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाणे आणि भाजपच्या जयंत भावे यांनी तर हडपसर मुंढवाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या पुजा कोद्रे आणि भाजपच्या उज्ज्वला जंगले, भवानी पेठच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या वनराज आंदेकर आणि भाजपच्या सुलोचना कोंढरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.

प्रभाग समितीचे नाव आणि बिनविरोध अध्यक्ष पुढील प्रमाणे – औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय – भाजपच्या ज्योती कळमकर , शिवाजीनगर घोले रोड – आदित्य माळवे, सिंहगड रोड- नीता दांगट, कोंढवा येवलेवाडी – मनिषा कदम, कसबा विश्रामबागवाडा -स्मिता वस्ते, बिबवेवाडी – प्रवीण चोरबेले, येरवडा कळस धानोरी – मारुती सांगळे, कोथरूड -छाया मारणे, वानवडी रामटेकडी- राष्ट्रवादीच्या रत्नप्रभा जगताप.

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीमध्ये एकूण आठ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे चार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नगरसेवकांची संख्या सारखी आहे. त्यामुळे चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड आणि भाजपच्या मंगला मंत्री यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे चिठ्ठीवर ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.