पुणे – निवडणुकीसाठी प्रत्येक पीएमपीसाठी 8 हजार रु. भाडे

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने निवडणुकीसाठी 724 बसेस देण्यात येणार आहेत. या बसेस पीएमपीएमएलकडून सशुल्क देण्यात येणार आहेत.

उपलब्धपैकी 1,372 बसेस पीएमपीएमएलच्या आहेत. तर 577 कंत्राटी बसेस आणि 25 ई-बसेस पीएमपीएमएल आहेत. या एकूण 1,974 बसेसपैकी दि. 22 आणि 23 रोजी 361 बसेस तर दि. 28 आणि 29 साठी 363 बसेस पाठविण्यात येणार आहेत. पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या मतदार संघांमध्ये दि. 23 आणि 29 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या बसेस निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहेत.

दैनंदिन संचलनातील बसेसच्या उत्पन्नानुसार, या कालावधित पाठविण्यात येणाऱ्या बसेससाठी दर दिवशी 8 हजार रूपयांप्रमाणे शुल्क निवडणूक आयोगाला आकारण्यात आले आहे. यानुसार एकूण 1 कोटी 15 लाख 84 हजार रूपये निवडणूक आयोगाला आकारण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील 13 डेपोमधून पाठविण्यात 724 बसेस पाठविण्यात येणार आहेत. बसेसच्या फेऱ्या, शहरातील संचलन यासह प्रवाशांची गैरसोय होणार नाही याचा विचार करून बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे, असे पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.