पुणे – पेशवे उद्यानालगत उभारल्या 8 फूटी संरक्षक जाळ्या

कात्रज – नानासाहेब पेशवे उद्यानाकडे जाणाऱ्या चौकाजवळील रस्त्याच्या बाजूला आठ फूटी उंचीच्या संरक्षक जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांतर्फे रस्त्याच्या बाजूला ओढ्यामध्ये कचरा टाकण्यास प्रतिबंध होणार आहे. शिवाय या संरक्षक जाळीमुळे तिथे लावण्यात आलेल्या वृक्षांना देखील संरक्षण मिळणार आहे. यामुळे या रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येवर मात करता येईल, असे जाणकारांचे मत आहे.

पेशवे उद्यानाच्या बाजूने जाणारा हा ओढा कायमच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांद्वारे यातील कचरा काढण्यात येतो. तो साफ ठेवण्यात येतो. तसेच यामुळे या ओढ्यामार्फत पाणी तलावात जाते ते कचरामुक्त पाणी जावे, याकरिता या संरक्षक जाळ्या खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.