पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत शनिवारी 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर कोविशिल्डचे 200, तर कोव्हॅक्सिनचे 700 डोस मिळतील.
कोविशिल्ड लस ही 188 केंद्रांवर, तर कोव्हॅक्सिन ही लस 7 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 20 वरून 15 टक्के करण्यात आली आहे, तर ऑन दी स्पॉट बुकिंगची टक्के वारी 20 वरून 15 टक्के करण्यात आली आहे, तर कोव्हॅक्सिनची 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.