पुणे : करोना व्यापार सेवा पुरस्काराने 51 व्यापारी सन्मानित

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने व्यापाऱ्यांचा सन्मान

पुणे – करोना काळात डॉक्‍टर, पोलीस यासह व्यापाऱ्यांनीदेखील जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा दिली. अनेकांना मदत केली. व्यापारी हा देखील करोना योध्द्याप्रमाणे लढला. व्यापाऱ्यांच्या करोना काळातील या कार्याचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गौरव करण्यात आला. करोना व्यापार सेवा पुरस्काराने शहरातील विविध व्यवसाय करणाऱ्या 51 व्यापाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, महिला विभाग अध्यक्ष शिल्पा भोसले, नवनाथ सोमसे, विजय नरेला, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व्यापारी वर्गासाठी उत्तम काम करीत असून, करोना काळात व्यापाऱ्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान करताना आनंद होत असल्याचे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

तर निवंगुणे म्हणाले, व्यापारी वर्गाने करोना काळात नागरिकांना मोठी मदत केली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जेवणासह अनेक गोष्टींसाठी मदत केली. करोनामधील व्यापाऱ्यांनी केलेली सेवा योद्‌ध्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.