पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीसाठी शुक्रवारी (दि. ३१) मतदान झाले. १० हजार २९९ मतदार वकिलांपैकी ५ हजार १७६ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर सायंकाळी मतमोजणी सुरू करण्यात आली.
यंदा अध्यक्ष पदासाठी दुहेरी लढत होत आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी चौघे रिंगणात आहेत. सचिवपदाच्या दोन जागांसाठी पाच जण नशीब अजमावत आहेत. खजिनदारपदासाठी तिघांमध्ये लढत होत आहे.
ऑडिटर आणि दहा कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच निवड झाली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. शिवाजीनगर न्यायालयात दोन ठिकाणी मतदान होते.