पुणे : दिवसभरात 451 जणांना डिस्चार्ज, 307 नवे करोनाबाधित

पुणे – शहरात करोनामुक्‍त झालेल्यांची संख्या बुधवारी दिलासादायक राहिली आहे. दिवसभरात 451 जणांना घरी सोडण्यात आले; तर दिवसभरात नवे 307 बाधित सापडले आहेत.

बुधवारी नोंद झालेल्या बाधित रुग्णांचा समावेश करून शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 76 हजार 769 झाली आहे. तर त्यातील 1 लाख 67 हजार 306 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

बाधितांमधील 4,875 रुग्ण ऍक्‍टिव्ह असून, त्यातील 385 रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यापैकी 225 रुग्णांना व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत.

एकूण 4,588 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3,447 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.