पुणे – 45 कोटींची वर्गीकरणे फक्‍त 10 मिनिटांत मान्य

पुणे – मंगळवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत अवघ्या 10 मिनिटांत 45 कोटी रुपयांची वर्गीकरणे मान्य करण्यात आली. या मुख्यसभेसाठी सोमवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आयुक्तांनी अंदाजपत्रकातील वर्गीकरणांना शिस्त लावण्यासाठी आदेश काढून आठ दिवस होण्याआधीच ही वर्गीकरणे झाली आहेत.

स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर नगरसेवकांनी 35 प्रस्ताव यापूर्वीच दिले होते. त्यामध्ये सुमारे 12 कोटी रुपयांच्या कामांचे वर्गीकरण सूचविण्यात आले होते. सोमवारी (दि.17) सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू होताना आयत्यावेळी 48 वर्गीकरणांचे प्रस्ताव नगरसेवकांनी दाखल केले. त्यामध्ये 10 लाखांपासून ते 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामांचे वर्गीकरण सूचविण्यात आले होते. त्यात पटापट बदल करून एकाच बैठकीत सुमारे 45 ते 50 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. एप्रिलमध्ये अंदाजपत्रक तयार करताना ड्रेनेजलाइन-जलवाहिनी टाकणे, रस्ता करणे बहुउद्देशीय हॉल बांधणे, इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे, रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, विद्युत विषयक कामे करणे, वाहनतळ उभारणे अशी विविध कामे सूचविली होती. पण आता ही कामे रद्द करून एका कामाची तरदूत तीन-चार कामांमध्ये विभागून नवीन कामे वर्गीकरणांमध्ये सूचविण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)