Pune: चोरी गेलेले 42 मोबाईल लष्कर पोलिसांकडून नागरिकांना परत

पुणे – शहर परिसरातून चोरी गेलेले ४२ मोबाईल फोन लष्कर पोलिसांकडून नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून लष्कर पोलिसांकडून  ही कामगिरी करण्यात आली. ४ लाख ७५ हजार एवढी या मोबाईलची किंमत आहे.

लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी (दि.१४) नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हे मोबाईल परत देण्यात आले. महागडे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांभळे, सहायक निरीक्षक मनमीत राऊत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अंमलदार गणेश कोळी, मंगेश बोराडे, पवन भोसले, सचिन मांजरे, महेश कदम, मंगल लाकडे आदींनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.