पुणे, दि. 19 -मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घेण्यात येणाऱ्या “ब्लॉक’ मुळे रविवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्वच रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त 40 ते 50 एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस रविवार आणि सोमवारी पुणे स्टेशन बसस्थानक येथून सुटतील. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मस्जिद बंदर दरम्यान असलेला कर्णाक पूल पाडण्यासाठी 27 तासांसाठी “मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गासह मुंबईतून सुटून पुण्यामार्गे धावणाऱ्या 36 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस शनिवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी दुपारपर्यंत धावतील.
पुणे रेल्वे स्थानकात “हेल्प बूथ’
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी “हेल्प बुथ’ ची स्थापना केली आहे. तसेच अतिरिक्त चौकशी खिडकी सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे तत्काळ परत करण्यासाठी अतिरिक्त खिडकी सुरू केली आहे. रेल्वे स्टेशनवर सतत रद्द, पुण्यापर्यंत धावणाऱ्या आणि पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेची माहिती देणारी उद्घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
आज पुणे येथून सुटणाऱ्या ट्रेन : मुंबई-केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (11301), मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (11029), मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (16331), मुंबई-गडग एक्स्प्रेस (11139), मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस (12115),
आज रद्द असलेल्या ट्रेन : मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12127/28), मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (11007/08), मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (11009/10), मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस (12125/26), मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (12123/24), मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (17411)
21 नोव्हेंबरला रद्द ट्रेन : मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस