पुणे – जुन्या भांडणाच्या वादातुन तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खुन केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 25) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत घडला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासाठी नानावाडा येथील नागरिकांनी आज समर्थ पोलीस ठाण्यात मोर्चा नेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक याची भेट घेऊन आरोपीना कडक शिक्षा देत, या गुन्ह्यात त्याच्या घरातील सहभागी व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात तीनशेहून अधिक नागरीक जमा झाले होते.
अक्षय वल्लाळ (रा. नाना वाडा, नाना पेठ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नाना वाडा, नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33, रा. नाना वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.