पुणे –दिवसभरात 250 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार बाधित पुण्याबाहेरील आहेत. याशिवाय 222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत 28 लाख 25 हजार
78 संशयितांची स्वॅब टेस्ट शहरात करण्यात आली. त्यात 4 लाख 85 हजार 285 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यातील 4 लाख 73 हजार 535 जण बरे झाले आहेत. परंतु सध्या बाधित असलेल्यांमध्ये 3 हजार 30 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 224 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्सेच 361 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
शहरात आजपर्यंत 8 हजार 720 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यात गेल्या 24 तासांत मृत पावलेल्या पाच जणांचा समावेश आहे. दिवसभरात 8 हजार 403 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.