पुणे : 24 तास पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पुर्ण करावे – आमदार मुक्ता टिळक

पुणे – शहरांच्या मध्यवर्ती भागातील पाण्याच्या वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेमध्ये या वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. यामाध्यमातून मध्यवर्ती पेठांमधून पाण्याची समस्या दुर होईल. योजनेचे काम यासाठी वेळेत पुर्ण होणे आवश्यक असल्याचे आमदार  मुक्ता शैलेश टिळक यांनी सांगितले.

शहरामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत. मध्यपेठांमध्ये गुरुवारी कामाला सुरुवात करण्यात आली. याकामाचे भूमीपुजन आमदार टिळक यांच्या हस्ते ब्राम्हण मंगल कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी नगरसेविका गायत्री खडके, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक त्रंबक आपटे, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, किरण जगदाळे,उदय लेले, आदी उपस्थित होते. यावेळी आमदार टिळक यांच्या हस्ते सेंद्रीय भाजीपाल्याचे वापट करण्यात आले.

यावेळी टिळक म्हणाल्या, पेठांमधील पाण्याच्या वाहिन्या या अत्यंत जुन्या आहेत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेमध्ये दुसर्‍या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यानंतर जुन्या वाहिन्या बंद करण्यात येतील. या योजनेमुळे नागरिकांना चोवीस तास पाणी मिळणार आहे.

यासाठी महापालिका मिटर लावणार आहे. आवश्यक तेव्हढेच पाणी नागरिकांनी वापरावे हा त्यामागचा उद्देश आहे. मिटरमुळे पाण्याची बचत सुध्दा होणार आहे. मिटर लावले की बील येणार असे नाही. संपुर्ण पुणे शहरामध्ये ही योजना सुरु झाल्यानंतर मिटरचे बील येणार आहे. या योजनेमध्ये पाणी पुरवठयाच्या विचार करुन वाहिन्या बदलण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.