पुणे – 2,393 नवीन करोनाबाधित

पुणे  – दिवसभरात 2 हजार 393 करोना बाधितांची नोंद झाली असून, 75 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4 लाख 54 हजार 457 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 4 लाख 21 हजार 672 बाधित बरे झाले आहेत. त्यामध्ये गुरुवारी डिस्चार्ज मिळालेल्या 4 हजार 135 जणांचा समावेश आहे. 

बाधितांमधील 25 हजार 222 रुग्ण सक्रिय असून, त्यातील 1 हजार 372 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील 6 हजार 302 रुग्णांना ऑक्‍सिजन लावले आहे. गेल्या 24 तासांत 75 जणांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत एकूण 7 हजार 563 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 12 हजार 738 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.