पुणे: शहरात 220 नवे करोनाबाधित आढळले

सक्रिय बाधित संख्या सव्वादोन हजारांवर

पुणे –शहरातील नवीन करोना बाधितांचा आकडा सध्या 200 ते 250 स्थिरावला आहे. मंगळवारी शहरात 220 नवे बाधित आढळले आहेत. तर दिवसभरात 331 जणांना डिस्चार्ज मिळाला.

दरम्यान, करोनाने आणखी 15 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 10 जण शहराबाहेरील आहेत. शहरातील सक्रीय बाधितांची संख्या सध्या 2,354 वर आली आहे.

मनपा आरोग्य विभागाकच्या माहितीनुसार, शहरातील एकूण बाधितांची संख्या 4 लाख 76 हजार 210 झाली आहे. त्यातील, 4 लाख 65 हजार 314 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आतापर्यंत एकूण 8 हजार 542 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने आतापर्यंत शहरात सुमारे 26 लाख 23 हजार 662 करोना चाचण्या केल्या असून, मंगळवारी 4 हजार 878 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर शहरात 342 जणांची प्रकृती गंभीर असून 482 जण ऑक्‍सिजनवरआहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.