पुणे(प्रतिनिधी) : मुंबई घाटकोपर परिसरातून बंदोबस्त करून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप दोनच्या कंपनीतील २० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोना आजार सदृश त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या चाचण्या केल्या असता, 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र अद्याप ३३ पोलिसांचे अहवाल येणे बाकी आहे.