पुणे – सव्वादोन हजार शौचालये जून अखेरपर्यंत पूर्ण करा

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला सूचना

पुणे – जिल्ह्यातील सर्वांना शौचालय मिळण्यासाठी पहिल्या सर्वेक्षणातून सुटलेल्यांसाठी पुन्हा एकदा पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात 11 हजार 887 कुटुंबाकडे शौचालये नसल्याचे आढळून आले. सध्या यापैकी 9 हजार 506 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून 2 हजार 381 शौचालयांचे बांधकाम शिल्लक आहेत. यासाठी वारंवार मुदतवाढ द्यावी लागली आहे. आता जूनपर्यंत सर्व बांधकामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्हा लोटामुक्त घोषित केल्यानंतर झालेल्या सर्वेक्षणात 11 हजार कुटुंबांकडे शौचालये नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या कुटुंबांना शौचालये उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषेदकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला. या बांधकामासाठी प्रत्येक कुटुंबाला केंद्राकडून 12 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यासाठी सर्वेक्षणातील शौचालय नसलेल्या कुटुंबनी शौचालय बांधून नियमित वापर करण्यास सुरूवात करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर बांधलेल्या शौचालयचा फोटो वेबसाइटवर अपलोड करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शौचालय मुदतीत बांधकाम करून शासनाच्या योजनेचे लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.