पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 139 करोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्या 284 Puneरुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील 5 रुग्णांसह 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात आजमितीला 2 हजार 642 करोना सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी 225 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 85 हजार 855 जणांना बाधा झाली असून, त्यापैकी 4 लाख 74 हजार 477 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 हजार 736 जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत 4 हजार 595 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे.