तब्बल 29 शाळांचा निकाल शून्य टक्के
पुणे – इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या राज्यातील 22 हजार 921 शाळांपैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. दरम्यान 29 शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची विभागनिहाय संख्या :
पुणे-2042, नागपूर -1433, औरंगाबाद-1172, मुंबई-1975, कोल्हापूर-1649, अमरावती-1268, नाशिक-1182, लातूर-960, कोकण-539