पुणे – पावणेबारा लाख मतदारांनी बजावला हक्क

शिरूर लोकसभा निवडणूक : 59.46 टक्के मतदान

पुणे – शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये 21 लाख 73 हजार 484 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2 लाख 2 हजारांनी मतदान वाढले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरसीची झाली आहे. दोन तगडे उमेदवार रिंगणात असल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीची राज्यात चर्चा होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील भोसरी व हडपसर मतदारसंघ वगळता बाकी मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण असे दोन्ही भाग समाविष्ट होतात. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

मतदारांच्या संख्येमध्ये सर्वाधिक मतदान हे भोसरी विधानसभा मतदारसंघात झाले. या मतदारसंघात 2 लाख 37 हजार मतदारांनी मतदान केले. त्याखालोखाल हडपसर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 33 हजार मतदान, शिरूर मतदारसंघात 2 लाख 27 हजार, खेडमध्ये 2 लाख, आंबेगावमध्ये 1 लाख 97 हजार तर जुन्नरमध्ये 1 लाख 93 हजार मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदासंघात 62.73 टक्‍के पुरुष मतदारांनी तर 55.83 टक्‍के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 7 लाख 18 हजार तर 5 लाख 74 हजार स्त्री मतदारांनी मतदान केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.