पुणे – 11 हजार पोलिसांचा फौजफाटा

पुणे, बारामती लोकसभा मतदानाची जय्यत तयारी

पुणे – पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये पुणे, बारामती, शिरुर या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघांत मंगळवारी (23 एप्रिल) मतदान होणार आहे. या मतदानासाठी जवळपास 11 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडल्यास दहा मिनिटांत क्विक रिप्सॉन्स टीम पोहचेल, असे नियोजन केले आहे. यामध्ये इन्स्टट रिप्सॉन्स टीम, प्रॉम्ट रिप्सॉन्स टीम, क्राईम रिप्सॉन्स टीम, डिव्हीजनल रिप्सॉन्स टीम, झोनल रिप्सॉन्स टीम या पाच प्रकारच्या टीमचा समावेश आहे.

मतदान प्रक्रियेत नागरिकांना निर्भयपणे सहभागी होता यावे, यासाठी पुणे पोलीस आयुक्‍तालयातर्फे मतदान केंद्र व परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये पेट्रोलिंग बरोबरच नियंत्रण कक्ष, राखीव मनुष्यबळ आदी सर्वसमावेशक बंदोबस्त योजना तयार केली आहे. यामध्ये पोलीस महासंचालक यांनी बाहेरुन बंदोबस्तासाठी उपलब्ध करून दिलेले अधिकारी व कर्मचारी तसेच एस.आर.पी.एफ., सी.पी.एम.एफ. आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. हा बंदोबस्त 23 एप्रिल रोजी होणाऱ्या 2,509 मतदान केंद्रे आणि 29 एप्रिल रोजी होणाऱ्या 441 मतदान केद्रांवर लावण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंगची व्यवस्था पोलीस उपायुक्‍त व सहायक पोलीस आयुक्‍त यांना अतिरीक्‍त स्ट्रायकिंग बंदोबस्तासह आवश्‍यक ते मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरात गुन्हे दाखल असलेल्या 7,271 जणांची मागील तीन दिवसांपासून झाडाझडती घेण्यात येत आहे. तर मागील दोन महिन्यांत 1,840 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

बंदोबस्ताची ठळक वैशिष्ट्य
* प्रथम टप्प्यातील 2,509 बूथसाठी 2,470 पोलीस कर्मचारी व 1,540 होमगार्ड
* प्रत्येक क्रिटीकल बूथसाठी 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड
* वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या वाहनासोबत मिनी स्ट्रायकिंग टीम
* क्राईम रिन्स्पॉन्स टीमची तीस पथके

स्ट्रॉंग रुमला कडेकोट बंदोबस्त
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघांतील मतपेट्या शिवाजीनगर गोडाऊन येथील स्ट्रॉंगरुममध्ये ठेवण्यात येणार आहेत. या स्ट्रॉंगरुमला तीन स्तरावर कडक बंदोबस्त असणार आहे. स्ट्रॉंगरुमच्या आतल्या बाजूला “सीआरपीएफ’चे जवान, त्याबाहेर “एसआरपीएफ’चे जवान आणि परिसराच्या बाहेरच्या बाजूला पुणे पोलिसांचा बंदोबस्त, अशी रचना असणार आहे.

4,896 पोलिसांचे पोस्टल मतदान
निवडणूक बंदोबस्तात असताना मतदानाच्या हक्‍काला पोलीस कर्मचारी मुकतात. मात्र, पुणे पोस्टल मतदानामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा पुणे पोलीस दलातील 4,896 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

निवडणुकीचा बंदोबस्त
पोलीस उपायुक्‍त – 10, सहायक पोलीस उपायुक्‍त – 20, पोलीस निरिक्षक 91, सहायक पोलीस निरीक्षक 438, पोलीस कर्मचारी – 5,104, होमगार्ड – 1,828, सीपीएमएफ (सीआरपीएफ 2 कंपनी, एसएपी 1, आरपीएफ 1 कंपनी), एसआरपीएफ 3 कंपनी यांचा समावेश असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.