पुणे –महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची थकबाकी वसूल होण्यासाठी स्थायी समितीने मिळकतकराची एक कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांसाठी “अभय योजना’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. या अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेला 1 हजार 471 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली होती. एक कोटी रुपयांपर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात येत आहे. या योजनेची मुदत 26 जानेवारीपर्यंत होती. ती आता वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. मात्र, त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही. दरम्यान, दि. 7 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अभय योजनेतून महापालिकेला चालू आर्थिक वर्षात पालिकेला तब्बल 1 हजार 471 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.