पुणे – 108 रूग्णवाहिकेने 2 जणांना दिले जीवनदान

पुणे – लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी येणारे मतदार, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्यसेवेसाठी बिव्हीजीच्या 108 रुग्णवहिकेची सेवा मतदारसंघानुसार उपलब्ध करण्यात आली होती. दिवसभरात कोथरूड येथे या रुग्णवाहिकेने दोन जणांना जीवनदान दिले. तर काही व्यक्तींना किरकोळ उपचार दिले.

कोथरूड मतदार संघ 210 येथे भरत अरुण जगताप हे मतदान ड्युटीवर असताना अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे घटनास्थळी असलेल्या 108 रुग्णवाहिकेतील डॉक्‍टरांच्या पथकाने त्यांच्यावर त्वरित उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले. तसेच कोथरूड येथील लोकमान्य वसाहत येथे राहणाऱ्या 21 वर्षीय विनोद थापा हा युवक सह्याद्री प्रशाला येथे मतदानला आला होता. त्याला अचानकपणे झटके आल्याने त्याची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णवाहिकेने त्यांच्यावर उपचार सुरू करून पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय दाखल करण्यात आले. डॉ. दीपक पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली 108चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. स्मिता दर्शनकर, डॉ. अश्विनी देशपांडे आणि चालक अविनाश ओव्हाळ रुग्णांना सेवा दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.