पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात 59.49 टक्के मतदान झाले. मतदारसंघातील 22 लाख 97 हजार 405 पैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदान केले. 2014 च्या तुलनेत यंदा 1 लाख 19 हजार मतदान वाढले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या तीन मतदारसंघांचा समावेश होतो. यंदा मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान पनवेल मतदारसंघात झाले असून याठिकाणी 2 लाख 98 हजार मतदान झाले आहे.
त्याखालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 83 हजार मतदान झाले. कर्जतमध्ये 1 लाख 89 हजार मतदान, उरणमध्ये 1 लाख 95 हजार मतदान, मावळमध्ये 2 लाख 11 हजार मतदान आणि पिंपरीमध्ये 1 लाख 89 हजार मतदान झाले आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 11 लाख 74 हजार मतदान झाले होते. त्यावेळी मतदानाची टक्केवारे 60.11 टक्के होती. यंदा मात्र 59.49 टक्के मतदान झाले आहे.