नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले कि, दहशतवाद देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, पुलवामा हल्ल्यामुळे देशाच्या एकात्मतेला कधीही तडा जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. ही वेळ राजकारण करण्याची नसून आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकार आणि सैन्य दलाबरोबर उभे आहोत, असेही राहुल गांधींनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1096294948234821633
Ads