#PulwamaAttack : हल्ल्यासाठी जेएनयूच्या शिक्षिकेने ठरवले मेहबुबा मुफ्तींना दोषी 

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील एका शिक्षिकेने पुलवामा हल्ल्यासाठी थेट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दोषी ठरवले आहे. जेएनयूच्या शिक्षिका अमिता सिंह यांनी ट्विटरवरून आरोप केला आहे. याविरोधात पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाने (पीडीपी)ने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमिता सिंह यांनी म्हंटले कि, आरडीएक्सने भरलेल्या वाहनांची तपासणी होऊ शकली नाही कारण मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असताना ३ सुरक्षा चेक बॅरियर काढले होते. याचा परिणाम म्हणजे पुलावामध्ये दहशतवादी हल्ला झाला, असा आरोप करत त्या पुढे म्हणाल्या, या घटनेचा मुफ्तींना पश्चाताप असेल तर पीडीपी प्रमुखांना सार्वजनिकरित्या शिक्षा देण्यासाठी आपल्या ४० माणसांकडे सोपविले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यानंतर तात्काळ पीडीपीने ट्विट करत अमिता सिंह यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. तर मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले कि, कुठलाही व्यक्ती जो शिक्षण देतो. तो एवढा अज्ञानी कसा असू शकतो? काय तो खऱ्या अर्थाने शिक्षित आहे. हे केवळ काश्मिरींना सतावण्यासाठी केलेली भ्रामक कल्पना आहे, त्यांनी ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.