“पुलवामा’च्या मास्टर माईंडच्या साथीदाराकडून देशभरात घातपाताचा कट

“एनआयए’च्या आरोपपत्रामधील दावा

नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुदस्सिर अहमद खान यांचा साथीदार अणि जैश ए मोहंम्मदचा म्होरक्‍या सज्जाद अहमद खान हा दिल्ली-राजधानी क्षेत्रासह देशभर घातपाती कारवायांचा कट करत असल्याचा दावा “एनआयए’ने दिल्लीतल्या न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. सज्जाद हा देखील पुलवाम हल्ल्यातील संशयित आहे. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते.

जैश ए मोहंम्मदच्या चार हस्तकांविरोधात दहशतवादी कारवायांच्या कटाचा आरोप असलेले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कारस्थन, सरकारविरोधात युद्ध पुकारणे किंवा युद्धाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याची विविध कलमे आणि स्फोटक पदार्थ विषयीच्या कायद्याखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.
या षडयंत्रामागील मुद्दसिर हा मुख्य सूत्रधार होता, परंतु मार्च, 2019 मध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाल्यानंतर त्याच्यावरील आरोप कमी करण्यात आले, असे “एनआयए’ने अंतिम अहवालात म्हटले आहे.

हे प्रकरण दिल्ली-एनसीआरसह भारताच्या विविध भागात दहशतवादी हल्ले घडविण्याच्या जैश ए मोहंम्मदच्या वरिष्ठ कमांडरांनी केलेल्या गुन्हेगारी कारस्थानाशी संबंधित आहे. आरोपपत्रात सज्जाद अहमद खान (वय 27), तन्वीर अहमद गनी (29), बिलाल अहमद मीर (वय 23) आणि मुजफ्फर अहमद भट (वय 25) यांच्या नावांचा उल्लेख असून हे सर्व पुलवामा येथील रहिवासी आहेत. हे सर्व आरोपी अतिरेकी हल्ले करण्याची योजना आखत असत, असे तपासात असे सिद्ध झाले आहे. सज्जाद आणि मुजफ्फर अहमद भट हे दोघे मुदस्सिर यांच्याशी थेट संपर्कात होते, तर तन्वीर अहमद गनी आणि बिलाल अहमद मीर सज्जादच्या माध्यमातून मुदस्सिरच्या संपर्कात होते, असा दावा “एनआयए’ने केला आहे.

तन्वीर अहमद गनी आणि बिलाल अहमद मीर यांना पुलवामा हल्ल्यासारखेच हल्ले करायचे होते. सज्जाद अहमद खानचे दोन मोठे भाऊ जैशचे सक्रिय दहशतवादी होते. ते सुरक्षा दलांबरोबर दोन वेगवेगळ्या चकमकीत ठार झाले होते. सुरुवातीला हे तीन भाऊ दगडफेक करण्यात गुंतले होते. त्यानंतर तो जैशमध्ये दाखल झाला आणि त्याला दिल्ली-एनसीआर क्षेत्राची पहाणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सज्जादला दिल्ली पोलिसांनी लाजपत राय मार्केटजवळ अटक केली होती आणि हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडशी नियमित संपर्क होता असे “एनआयए’ने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here