#PulwamaAttack : …सरणावरची आग अजूनही विझली नाही – जितेंद्र जोशी

पुणे – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने सुध्दा आपल्या मनातील संताप कवितेच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.

जितेंद्र जोशीची कविता –

सरणावरची आग अजूनही विझली नाही
मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही
निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रक्तानेही भिजली नाही

आग लागली अवतीभवती
मनात पण ठीणगीहि नाही
अब्रू स्वाभिमान चिरडला
कितीक किड्यांसम फुटले
ती गणतीही नाही
सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही
मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही

धर्म जाहला शाप
पसरले पाप
उरी अंधार दाटला
गिळून घेईल साप
लागुनी धाप
कोवळा जीव फाटला
अणु रेणूंचा स्फोट होऊनी
जळतो आम्ही
देवा(?) आता मनात आशा उरली नाही

निलाजर्या लोकांचे जगणे अप्पलपोटी
मने कोरडी रकतानेही भिजली नाही

-जितेंद्र जोशी

https://www.instagram.com/p/Bt4vGTElQoG/?utm_source=ig_web_copy_link

अशाप्रकारे जितेंद्रने कवितेच्या माध्यमातून त्याच्या मनातील भावना व्यक्त करत पुलवामामध्ये झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.