सरकारला सत्तेवरून खाली खेचा

खासदार डॉ. कोल्हे : अशोक पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरेत सभा

तळेगाव ढमढेरे- जाहिराती बघून तेल, मीठ, साबण विकत घेता येते. सरकार घेता येत नाही. या वास्तवाची जाणीव जनतेला झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता जाहिरातबाज सत्ताधारी सरकारला सत्तेवरून खाली खेचेल, असा विश्‍वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केला.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे येथे आयोजित सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी शिरुर तालुका अध्यक्ष रवी काळे,विद्या सहकारी सहकारी बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे,कौस्तुभ गुजर, उपसभापती विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, बाळासाहेब ढमढेरे, पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालिका वर्षा शिवले,विद्या भुजबळ, आरती भुजबळ, अनिल भुजबळ, माजी जि. प. सदस्य शंकरकाका भूमकर, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, कांतीलाल गवारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोणत्याही शेतमालाला भाव नाही. पिक विमा मिळाला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर केली. राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जंजाळात अडकवले. आता जनतेला सरकारच्या ढोंगीपणाची जाणीव होऊ लागली आहे. जाणते नेते शरद पवार यांच्याच विचार महाराष्ट्राचा कायापालट करू शकतात. त्यामुळेच राज्यातील जनता राष्ट्रवादीसोबत आहे. शरद पवार यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण फिरले आहे. तसेच अशोक पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.

  • भाजप सरकारला शेतकरी हित कधीच समजले नाही. त्यांनी कायम शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली.
    – अशोक पवार, माजी आमदार
  • विरोधकांना पराभव दिसू लागला
    अशोक पवार यांना सामान्य जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता. ते आताच आमदार झालेले उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांना अशोक पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी शिरूरमध्ये देशाच्या गृहामंत्र्यांना आणावे लागले, यातच विरोधकांचा पराभव दिसून येत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)