अमरावती – बडनेरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याचे गळफास घेत आत्महत्या केली आहे. परीक्षा फी भरली नाही म्हणून या विद्यार्थ्यांचा पेपर काढून घेतला त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊन उचलले आहे. असा आरोप विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अनिकेत अशोक निरगुडवार असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये घडला आहे. अनिकेतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बडनेरा पोलीसात धाव घेत आक्रोश केला आहे. कॉलेजच्या या कृत्यामुळे अनिकेतने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अनिकेतच्या कुटुंबीयांनी कॉलेजवर आरोप केले त्यामध्ये परीक्षा फी भरली नाही म्हणून मुलाचा परीक्षेचा पेपर हिसकावून घेतला. त्यामुळे वर्ष वाया जाणार या भीतीने आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. असे कुटुंबीयांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.